प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी परिवार ऑफ बेळगावने पोलीस दलाला एक हजार एन-95 मास्क दिले आहेत. पोलीस हे कोरोनाकाळात सदैव सेवा बजावत असून ते कोरोना योद्धे आहेत. या हेतूने रोटरीने हे मास्क दिले आहेत. रोटरीचे उपप्रांतपाल अजय हेडा, मनोज सुतार यांनी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याकडे हे मास्क सुपूर्द केले. याप्रसंगी रोटेरियन इरफान, रोटे. शीतल चिलमी, रोटे. मंजुनाथ अळवाणी उपस्थित होते.