प्रतिनिधी/ बेळगाव
रोटरी क्लब मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच लॉकडाऊनचे नियम पाळून साधेपणाने पार पडला. क्लबच्या नूतन अध्यक्षपदी अशोक कोळी, उपाध्यक्षपदी नारायण जाधव, सचिवपदी नागेश मोरे व खजिनदारपदी शिवानंद पडण्णवर यांची निवड झाली आहे. नूतन कार्यकारिणीला उपप्रांतपाल डॉ. मनोज सुतार यांच्या हस्ते अधिकारसूत्रे प्रदान करण्यात आली.
रोटरीचे मावळते अध्यक्ष अशोक मळगली यांनी स्वागत केले आणि गतवषीच्या कार्याचा आढावा घेऊन सर्वांना धन्यवाद दिले. डॉ. मनोज सुतार यांनी रोटरीच्या कामकाजाची माहिती देऊन अधिकारपदाची कर्तव्ये स्पष्ट केली.
अशोक कोळी यांनी अध्यक्षपदाबद्दल आनंद व्यक्त करून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवू, आमगाव येथे क्लबतर्फे 25 सोलार लाईट बसविण्यात येतील, कर्करुग्णांना मदत केली जाईल, तसेच उद्यमबाग येथेही सामाजिक कार्ये केली जातील, असे सांगितले.
याप्रसंगी मनोहर जरतारकर, राजीव पंडित, नारायण जाधव, राजू नाईक, अशोक मळगली, अरुणकुमार पाटील, अशोक बदामी, गुलाब चौगुले, रवी इंचल, अनिल मुतकेकर, डॉ. विजय पुजार, अनिल बागी, किरण लुगाडे आदी उपस्थित होते. सतीश नाईक यांनी स्वागत केले. गुलाबचंद चौगुला यांनी आभार मानले.