वृत्तसंस्था/ मुंबई
लँक्सेस इंडियाने कॉर्पोरेट सोशल रिस्पान्सिबिलिटी (सीएसआर) या अंतर्गत कोरोना महामारी संकटाविरोधात लढण्यासाठी जवळपास 2.1 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली आहे. सदरचा पैसा हा देशातील वैद्यकीय खर्चासाठी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसऱया लाटेत कोविडचा संसर्ग अतिशय वेगाने वाढत राहिला आहे.
रुग्णांसाठी आवश्यक असणाऱया महत्वपूर्ण मेडिकल उपकरणांची मागणी वाढत राहिली आहे. लँक्सेस इंडियाचे उपाध्यक्ष नीलांजन बॅनर्जी यांनी सांगितले आहे,की कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेमध्ये आमच्या देशात मेडिकल संदर्भातील विभाग प्रभावीत झाले आहेत. यामुळे आवश्यक अशा उपकरणांची कमतरता मोठय़ा प्रमाणात विभागांमध्ये जाणवत आहे. याकरीता सदरची मदत दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. लँक्सेस इंडियाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील रुग्णालयांकरीता जवळपास 1.9 कोटी रुपयांचे 20 अत्याधुनिक जर्मन व्हेंटिलेटर देणार असल्याचेही म्हटले आहे.