श्री परशुराम गोमंतक सेना
प्रतिनिधी / पणजी
सत्तरी येथील अंगणवाडी सेविका लता गांवकर यांना आधी बदलीची नोटीस व नंतर कारणे दाखवा नोटीस महिला व बाल कल्याण खात्याततर्फे जारी करण्यात आल्यानंतर यासदर्भात आम्ही खात्याच्या संचालिका दिपाली नाईक यांना या संदर्भात जाब विचारण्यासाठी भेट दिली. परंतु या संदर्भात दिपाली नाईक यांना भेटल्यानंतर कळाले की या विषयावर मोठय़ा प्रमाणात राजकारण झाले असून लता गांवकरांचे निमित्त घेऊन अनेक पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याचे चित्र आहे. असे समाजसेवक तथा श्री परशुराम गोमंतक सेनेचे प्रमुख शैलैंद्र वेलिंगकर यांनी सांगितले.
महिला व बाल कल्याण खात्याच्या संचालिका दिपाली नाईक यांना भेट दिल्यानंतर शैलेंद्र वेलिंगकर पत्रकारांना संबोधित होते. यावेळी त्यांच्यासोबत संघटनेचे उपाध्यक्ष सुनिल सांतईनेजकर, सचिव आदिश उसगांवकर, सदस्य गजानन मुटगेकर, व योगेश नाईक उपस्थित होते.
लता गांवकर ही दिव्यांग असून त्यांची बदली ही चूकीचे आहे. आणि या खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांचा या बदलीत मोठा हात आहे या गोष्टींवर आमचे ठाम मत आहे. परंतु दिपाली नाईक यांची बाजू देखील चूकीची नाही असे वाटते त्यामुळे हा विषय अधिक ना वाढवता सांमज्यांसपणे हा विषय सोडवावा अशी विनंती आम्ही यादरम्यान नाईक यांच्याकडे केली. असे वेलिंगकर यांनी पुढे सांगितले.
लता गांवकर यांच्यासोबत अनेक सामाजिक घटक आहेत
लता गांवकर यांच्या बदलीचा अनेक संघटनानी तिव्र निषेध केला, तीच्या मदतीला अनेकजण पुढे आले हे पाहून असे वाटते की सरकार झोपले असले तरी समाज अजून जागा आहे त्यामुळे सर्व सामाजिक घटकांचे अभिनंदन असे शैलेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले. लता गांवकर यासंदर्भात मला एकदाही भेटली नाही. तसेच दिव्यांग असलेले प्रमाणपत्र देखील गांवकर हीने खात्याला दिले नाही त्यामुळे त्यांच्या दिव्यांगाबद्दल आम्हाला काहीच माहीती नाही. असे दिपाली नाईक यांनी यावेळी सांगितले.