ब्राझीलच्या अध्यक्षांचे मोदींना पत्र
ऍस्ट्रोजेनेकाची लस लवकर पाठविण्याची विनंती ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. लसीच्या पुरवठय़ात विलंब झाल्यावर त्यांनी एक पत्र लिहिले आहे. बोल्सोनारो सरकारवर लसीकरण सुरू करण्याचा दबाव वाढत चालला आहे. क्षेत्रीय सहकाऱयांच्या तुलनेत ब्राझील मागे पडत असल्याची टीका होऊ लागली आहे.
भारताच्या लसीकरण कार्यक्रमाला धोक्यात न आणता ब्राझीलच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाला वेग देण्यासाठी 20 लाख डोसची अपेक्षा करत असल्याचे बोल्सोनारो यांनी पत्रात म्हटले आहे. भारताला यापूर्वीच देण्यात आलेल्या 20 लाख डोसच्या ऑर्डरसह अतिरिक्त डोसच्या आयातीकरता चर्चा सुरू आहे.