ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये लसीकरणाची समस्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे. शुक्रवारी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, आमच्याकडे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविशील्ड लसीचा पुरवठा उपलब्ध नसल्याने आज पासून राज्यातील काही लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
पुढे ते म्हणाले, 18 ते 44 वयातील नागरिकांसाठी आमच्याकडे कोविशील्ड उपलब्ध नाहीच आहे, त्याशिवाय ‘कोवॅक्सिन’ चा साठा देखील लवकरच संपणार आहे. राज्याला लस उपलब्ध नसल्याने आम्हाला 150 लसीकरण केंद्र बंद करावी लागणार आहेत. सरकारकडून 99 शाळांमध्ये सुरु करण्यात आलेल्या 368 लसीकरण केंद्रावर सतत लसीचा तुटवडा जाणवत आहे.
दरम्यान, एका दिवसापूर्वीच ‘आप’ च्या नेत्या आतिषा यांनी देखील सांगितले होते की, राज्यात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी ‘कोवॅक्सिन’ चा फक्त दोन दिवसांचा आणि कोविशील्डचा 9 दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे.