जामीन अर्जावर 9 मार्चला सत्र न्यायालयात सुनावणी
प्रतिनिधी /मडगाव
आपल्याच वडिलांचा खून केल्याचा आरोप असलेल्या वार्का येथील ज्युबेन मार्टीन (37) या महिलेच्या जामीन अर्जावर आता 9 मार्च रोजी सुनावणी होणार आहे तर पोलीस कोठडीत असलेल्या या संशयित आरोपी महिलेला आज शनिवारी मडगावच्या न्यायालयापुढे उभे करण्यात येणार आहे.
संशयित आरोपी ज्युबेन मार्टीन हिला 20 फेब्रुवारी रोजी कोलवा पोलिसांनी आपल्याच वडिलांच्या खून प्रकरणासंबंधी अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी या संशयित आरोपी महिलेला सर्वप्रथम न्यायालयापुढे उभे केले तेव्हा न्यायालयाने 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. 7 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर तपास यंत्रणेने या महिलेला पुन्हा न्यायालयापुढे उभे केले आणि या खुनाच्या तपासासंदर्भात आणखीही पोलीस कोठडीत ठेऊन तिची तपासणी करायची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर न्यायालयाने स्ंाशयित महिलेला आणखी 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.
पोलीस कोठडीची कोठडीची मुदत 5 मार्च रोजी संपत असल्यामुळे आज शनिवारी या संशयित आरोपी महिलेला न्यायालयापुढे हजर करणार असल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयापुढे वरील संशयित आरोपी महिलेच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. य्ािंवेळी या संशयित आरोपीच्या वकिलानी मुदत मागून घेतल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मार्च रोजी घेण्याचे निश्चित केले.