नवी दिल्ली
वन प्लस कंपनीचे नवे स्मार्टवॉच 21 एप्रिलला भारतीय बाजारामध्ये लाँच केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सदरच्या घडय़ाळाची किंमत 14,999 रुपये इतकी ठेवण्यात आली असल्याचे समजते. सदरचे स्मार्टवॉच मिडनाइट ब्लॅक आणि मूनलाईट सिल्वर या दोन रंगांमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. भारतीय ग्राहक सदरच्या स्मार्टवॉचची गेले काही दिवस आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता 21 एप्रिलला संपणार आहे. चिनी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी वन प्लसने मागच्या महिन्यामध्ये आपले पहिलेवहिले स्मार्टवॉच सादर केले होते. त्यावेळेला या स्मार्टवॉचची किंमत 17 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली होती. पण आता या घडय़ाळय़ाची किंमत 15 हजाराच्या आसपास ठेवली आहे. वन प्लस ऍप स्टोअरवर सदरचे घडय़ाळ 21 तारखेपासून खरेदी करता येणार असून घडय़ाळाची ऑफलाइन विक्री आणि ऑनलाईन विक्री 22 एप्रिलपासून सुरु होणार आहे.