पेडणे / प्रतिनिधी
वळपे येथे राष्ट्रीय महामार्गावरून माल वाहतूक करणारा एम. एच 46 ए .एफ 1087 या क्रमांकाचा ट्रक दुपारी रेडकर इस्पितळाजवळ म्हापसा मार्गे जाताना रस्त्याच्या बाजूल कलंडला.
वळपे येथे राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून कंञाटदारकडून कुठल्याच प्रकारची हे काम सुरू असताना वाहतूक करणाऱया वाहानासाठी दिशा दर्शक तसेच बॕरिकेट्स न लावल्याने दुसऱया राज्यातील वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने आतापर्यंत अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहे.
शुक्रवारीही रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूला कलंडलेला ट्रक हा थेट रस्त्याच्या सुरु असलेल्या कामासाठी वापरण्यात येणाऱया जेसीबीवर पडला.
ड़ कंञाटदार यांचा बेफिकीरपणा असल्याचा आरोप माजी सरपंच सीताराम परब यांनी केला आहे. वारंवार या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले.माञ सरकार व संबधित खाते सुस्त असल्याचे सीताराम परब म्हणाले. मुख्यमंत्री डाॕ.प्रमोद सावंत यांनी रस्ता कामाच्या संबंधित अधिकारी यांना सक्त ताकीद देत रस्त्याचे काम सुरू आहे त्याठिकाणी दिशा दर्शक फलक तसेच बाॕरिकेट्स लावण्यासाठी निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे.