प्रतिनिधी/ कुडचडे
कुडचडे येथील नामवंत कोकणी कथाकार वसंत सावंत यांच्या कलसांव या कथेच्या कथनाचा कार्यक्रम आज मंगळवार 10 रोजी संध्याकाळी 6 वा. पणजी दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित करण्यात येणार आहे. सदर कथेतून सावंत यांनी परिस्थितीचे वास्तव चित्रण समोर ठेवलेले आहे. अशाच प्रकारे त्यांनी कित्येक भावस्पर्शी कथा लिहिल्या असून त्यांच्या कथांचे इंग्रजीसह सुमारे बारा भारतीय भाषांतून अनुवाद झाले आहेत. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत विविध स्तरांवर त्यांच्या कथा समाविष्ट झाल्या आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती दूरदर्शनचे अधिकारी राजेंद्र फडते यांच्यातर्फे करण्यात आली आहे.