प्रतिनिधी/ सातारा
आता मुलांबरोबरच मुली ही सर्वक्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण करताना दिसत आहेत. त्यातच सातारा जिल्हा हा अगदी पूर्वीपासुन देशाच्या रक्षाणाकरीता स्थापन करण्यात आलेल्या नौसेना, वायुसेना व सैन्यदल या सर्व क्षेत्रात अधिक संख्येने दाखल आहेत. यातच आता सावित्रींच्या लेकींनी ही आपला पाया घट्ट रोवला आहे. वाई येथील स्नेहांजली ननावरे हिची इंडियन नेव्हीच्या वरिष्ठ पदावर निवड झाली आहे. येत्या काही दिवसातच ती केरळ येथे ट्रेनिंगकरीता रवाना होणार आहे.
इंडियन नेव्हीमध्ये वरिष्ठ पदावर रूजु होणारी जिल्हय़ातील पहिलीच मुलगी आहे. स्नेहांजली हिचे शालेय शिक्षण जॉय चिल्ड्रन अकॅडमी, वाई येथे झाले. त्यानंतर 11 वी किनविर महाविद्यालय, वाई, 12 वी जिजामाता महाविद्यालय पुणे, व पदवी किनविर महाविद्यालयात संपादन केली. स्नेहांजली हिला लहानपणापासुनच क्रिडा स्पर्धांमध्ये अधिक रस होता. यामध्ये ‘आर्चरी’ (धुर्नुविद्या) या क्रिडा प्रकारात तिने राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावरील विविध असे एकुण 120 हून अधिक पदक पटाविले आहेत. भारतिय आर्चरी’ गटात ही तिची यापुर्वी 4 वेळा निवड झाली होती.
तिचे वडील राजेंद्र व आई आरती ननावरे यांचा फुड मॅन्युफेक्चरिंगचा व्यवसाय आहे. आई-वडील दोघेही कराटे या खेळाच्या प्रकारात नैपुण्य आहेत. वडिलांनी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट व आईने ब्राऊन बेल्ट पटकाविला आहे. त्यांची द्वितीय कन्या ओमश्री हिने नुकतीच 12 वी मध्ये सायन्स विभागात 99.22 टक्के गुण पटकाविले असुन सध्या ती भारतीय खेल प्राधिकरणमध्ये हरियाणा येथे ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातुन शिक्षण घेत आहे. तिचे ऑलिंम्पीकमध्ये चमक दाखविण्याचे स्वप्न असून त्या माध्यमातून ती आपली वाटचाल करत आहे. ननावरे दांपत्यांना दोन्ही कन्या असून त्यांनी आपल्या दोन्ही ही मुलींना खेळाच्या माध्यमातुन उत्तम प्रकारे घडविले आहे.
सैनिक स्कुलमध्ये आता मुलींची एंट्री
महाराष्ट्रातील पहिले सैनिक स्कुल म्हणून परिचित असलेल्या सातारा सैनिक स्कुलमध्ये आता यंदापासुन मुलींना ही प्रवेश देण्यात येत आहे. यंदा 13 मुलींना प्रवेश देण्यात आला असून यापैकी एक मुलगी ही साताऱयातील आहे. त्यामुळे सैन्य दलात अधिकारी पदावर रूजु होण्याकरीता आता सातारा सैनिक स्कुलच्या माध्यमातुन मुलींना ही शिक्षण घेता येणार आहे. येत्या काही दिवसातच शाळा सुरू होणार आहे.