क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संदर्भ वाचनालयाचे साताऱयात लोकार्पण
प्रतिनिधी/सातारा
संपर्क क्रांतीच्या जमान्यात ग्रंथालये उपेक्षित राहिली असून ज्ञानाचा हा मूलभूत स्त्राsत दुर्लक्षित राहिल्यास समाज म्हणून आपण मागे पडू. म्हणूनच आधुनिक युगात वाचन संस्कृती टिकणे आवश्यक आहे. असे मत जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अमित सोनावणे यांनी व्यक्त केले. लेक लाडकी अभियानच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संदर्भ वाचनालयाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महिला आणि आरोग्यविषयक संदर्भग्रंथाचा अनमोल ठेवा या वाचनालयाच्या रूपाने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच या क्षेत्रातील संशोधकांसाठी साताऱयात खुला झाला आहे.
लेक लाडकी अभियानच्या वतीने मुक्तांगण येथे सुरू करण्यात आलेल्या या संदर्भ वाचनालयाची मांडणी रूपा मुळेआणि यशवंत मुळे यांनी केली असून महिला आणि सर्वासाठी आरोग्य या विषयावर अधिकअधिक संशोधकांनी येथील ग्रंथसंपदेचा लाभ घ्यावा असे आवाहन ऍड. वर्षा देशपांडे यांनी यावेळी केले. या लोकार्पण समारंभास रजीव मुळये, श्री ढगे, ऍड. शैलजा जाधव, ऍड. चैत्रा. व्ही. एस, कैलास जाधव, दीपेन्ती चिकणे, रूपाली मुळे, ऍड. वनराज पवार, माया पवार, स्वाती बलाळ आदी उपस्थित होते.