वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व उत्तेजक विरोधी एजन्सीच्या (वाडा) शास्त्राrय संशोधन आर्थिक बजेटसाठी भारतीय शासनाने 10 लाख अमेरिकन डॉलर्सची रक्कम देण्याची ग्वाही दिली आहे.
वाडाच्या शास्त्राrय संशोधन आर्थिक बजेटसाठी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताकडून सर्वाधिक आर्थिक मदत दिली जाणार आहे. भारतामध्ये उत्तेजक विरोधी कार्यक्रम क्रीडाक्षेत्रामध्ये राबवित असताना देशातील राष्ट्रीय उत्तेजक चांचणी प्रयोगशाळेवर निलंबनाची कारवाई झाल्याने उत्तेजक विरोधी कार्यक्रमावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभी वाडातर्फे देशातील राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
उत्तेजक चाचणी आणि निर्बंध घातलेल्या द्रवांचा शोध घेण्यासाठी या चांचणी प्रक्रियेमध्ये अधिक विकास होणे जरूरीचे आहे. यासाठी भारतीय शासनाकडून 10 लाख अमेरिकन डॉलर्सची रक्कम वाडाच्या शास्त्राrय संशोधन आर्थिक बजेटसाठी देण्याची ग्वाही क्रीडामंत्र्यालयाकडून देण्यात आली आहे. वाडाच्या या शास्त्राrय संशोधन आर्थिक बजेटसाठी चीन, सौदी अरेबिया आणि इजिप्त देशांच्या शासनानी आर्थिक मदत जाहीर केली आहे पण भारताचा वाटा या देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे क्रीडा मंत्र्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
वाडाचा शास्त्राrय संशोधन विभाग अधिक भक्कम बनविण्याची जरूरी असल्याचे मत वाडाच्या पोलंडमध्ये झालेल्या पाचव्या विश्व परिषदेत व्यक्त करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय शासनाने वाडाच्या शास्त्राrय संशोधन आर्थिक बजेटसाठी 10 लाख अमेरिकन डॉलर्सची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.