2 हजार रुपयांची लाच घेताना पकडले
प्रतिनिधी / बेळगाव
नव्या दुकानाच्या जीएसटी क्रमांक मंजुरीसाठी एका व्यापाऱयाकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाणिज्य कर विभागाच्या अधिकाऱयाला रंगेहात पकडण्यात आले आहे. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली आहे.
काकती येथील नदीम मुल्ला यांनी आपल्या नव्या मोबाईल दुकानासाठी जीएसटी क्रमांक मिळविण्यासंबंधी वाणिज्यकर कार्यालयात अर्ज केला होता. या विभागाचे निरीक्षक महबूब बाबालाल शिपाई याने नदीम यांच्याकडून जीएसटी क्रमांक मंजूर करण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. अधिकाऱयाच्या जाचाला कंटाळून नदीम यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीचे पोलीस अधिक्षक बी. एस. न्यामगौडर, उपअधिक्षक वेणुगोपाल, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी व्यापाऱयाकडून 2 हजार रुपयाची लाच स्वीकारताना वाणिज्यकर विभागाच्या अधिकाऱयाला रंगेहात पकडले आहे.