प्रतिनिधी /मडगाव :
बुधवारी मडगावात झालेल्या ज्वेलर स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अवघ्या सोळा तासांच्या आत दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. ओकार पाटील, एडसन गोल्साल्वीस दोघांना सांतापुझ येथून पकडले तर तिसरा मुस्तफा शेख शरण आला. मात्र खूनामगचे कारण स्पष्ट झाले नसल्याने खुनाचे गूढ वाढले आहे.
दम्यान हल्लेखोराने झाडलेली पिस्तूलातील गोळी आरपार जाऊनही मडगावचे युवा उद्योजक स्वप्नील वाळके यांनी मृत्यूपूर्वी हल्लेखोरांकडे ज्या पद्धतीने संघर्ष केला त्या त्यांच्या धाडसाद्दल मडगाव परिसरात वाखाणणी होत आहे.
बघ्यांबाबत सर्वांच्या संतप्त प्रतिक्रिया
रस्त्याच्या बाजूला जेव्हा ही हाणामारी होत होती तेव्हा अनेकजण रस्त्यावर होते. पैकी काहीजण या एकंदर प्रकरणाचे व्हिडीओ काढत होते तर बऱयाच जणांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या बघ्यांचा सर्वत्र धिक्कार होत आहे. एवढय़ा लोकांमध्ये एकही माणूस पुढे आला नाही.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला एक चेहरा
वाळके यांच्या आस्थापनातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पहिली तेव्हा पोलिसांना एका आरोपीचा चेहरा दिसला. जो पोलीस अधिकारी ही फुटेज पाहत होता तो त्या चेहऱयाला ओळखला. तिसवाडी तालुक्यातील सांताप्रुझ येथील मुस्तफा शेख हे त्याचे नाव होते. त्यानंतर या आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढा असे वरिष्ठांकडून फर्मान निघाले.
सांताप्रुझमध्ये घेरले ओंकार पाटीलला
पोलीस तपास सुरु झाला तेव्हा पोलिसांनी संशयित मुस्तफा शेख याचा अगदी जवळचा मित्र ओंकार पाटील याला ताब्यात घेतले. पाटील याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. ओंकार पाटील हा मिरामार येथील असून बुधवारी रात्री तो पोलिसांना सांताक्रूझ येथे सापडला.
खुनासाठी वापरली चोरीची जीप
ओंकार पाटील याला पोलिसांनी आपला इंगा दाखवताच त्याने तोंड उघडले आणि या खून प्रकरणात वापरलेली बोलेरो जीप आपण चोरी केलेली होती. सध्या ती खून झालेल्या ठिकाणीच आहे, अशी कबुलीही दिली.
एडसन गोल्साल्वीसच्या मुसक्या आवळल्या
ओकार पाटील याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सांताक्रूझ येथील इव्हेंडर रॉड्रिग्स याचा शोध चालू केला. हा शोध चालू असताना एडसन गोन्साल्वीस हा संशयित आरोपी सापडला.
बुधवारी दुपारी हा खून झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता या खून प्रकरणाचा तपास सुरु झाला होता. तो गुरुवारी पहाटे 4 वाजता संपला. मात्र खुनाचे कारण काय हे स्पष्ट झालेले नाही. हा खून दागिन्यांच्या चोरीपोटी झालेला नसावा किंवा यामागे आणखी काही कारस्थान आहे का, याचा तपास पोलीस सध्या करीत आहेत.
स्वप्नील वाळकेच्या धाडसाची चर्चा
हल्लेखोराने मेसर्स कृष्णी ज्वेलर्स या आस्थापनात प्रवेश करुन थेट गोळी झाडल्याचे चित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे सुत्रानी सांगितले. त्याचप्रमाणे झाडलेली गोळी वाळके यांच्या पोटातून आरपार गेली असल्याची माहितीही सुत्रानी दिली. याचाच अर्थ स्वप्नील वाळके दुकानातच अत्यंत गभीर जखमी झाला होता. त्या तशा स्थितीतही त्याने त्या हल्लेखोराला दुकानाबाहेर आणले. त्याला पकडण्याच्या बेतात असतानाच त्या हल्लेखोराने त्याच्या पोटावर सुऱयाने वार केले. या वारामुळे वेदना असहय़ झाल्याने तो जवळच असलेल्या पायऱयांवर खाली बसला. या त्यांच्या धाडसासंबंधी काल गुरुवारी 24 तासानंतरही मडगावात तसेच गोवाभर चर्चा चालू होती.