वृत्तसंस्था/ सेंट लुसिया
जमैकाचा वेगवान गोलंदाज मार्किनो मिंडले याला कोरोनाची बाधा झाल्याने विंडीज क्रिकेट संघाचे सुरू असलेले सराव शिबीर थांबवावे लागले. 26 वर्षीय मिंडलेची दुसऱयांदा कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
मिंडले कोरोना बाधित आढळल्याने विंडीज क्रिकेट संघाने आपले सराव शिबीर तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला. विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 10 जूनपासून प्रारंभ होणार आहे.