दुसऱया दिवशीही शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य, उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या विकेंड कर्फ्यूला दुसऱया दिवशीही बेळगावच्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनाने कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली. यामुळे दिवसभर शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले होते. मेडिकल, हॉस्पिटल वगळता इतर ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्मयात आणण्यासाठी शुक्रवार रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत विकेंड कर्फ्यूचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून विकेंड कर्फ्यूला सुरुवात करण्यात आली. शनिवारी बेळगावमध्ये कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारी आटोक्मयात आणण्यासाठी नागरिक घरीच होते. शनिवारप्रमाणेच रविवारीही सकाळी 10 नंतर शहरात शुकशुकाट पसरला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. शहरातील काही मोजकीच मेडिकल दुकाने रविवारी सुरू असल्याचे दिसून आले.
कॅम्प येथे करण्यात आला रस्ता बंद
शहरातील संचार कमी करण्यासाठी पोलिसांनी कॅम्प येथे बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला. यामुळे एका बाजूने रस्ता सुरू होता. परंतु त्या ठिकाणी पोलीस वाहनचालकांची कसून चौकशी करीत होते. विनाकारण फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. काहींना माघारीही धाडण्यात आले. कॅम्पसोबतच शहराच्या इतर भागातही वाहनचालकांची चौकशी केली जात होती.
गांधीनगर ब्रिजजवळ तपासणी
राष्ट्रीय महामार्गाने शहरात येणाऱया प्रत्येक वाहनाची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. गांधीनगर येथील ब्रिजजवळ बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता. एका बाजूने वाहनांची तपासणी करूनच वाहने पुढे सोडली जात होती. त्या ठिकाणी एसीपी शरणाप्पा स्वतः वाहनचालकांची कागदपत्रे तपासत होते. कागदपत्रे नसणाऱया वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
मुस्लीम बांधवांकडून पोलिसांना पाण्याचे वाटप
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या काळात समाजोपयोगी कार्य करण्याचे आवाहन केले जाते. सध्या बेळगाव शहर व उपनगरांमध्ये रखरखते ऊन आहे. या काळातही पोलीस नागरिकांसाठी सेवा बजावत आहेत. या पोलिसांना पाणी देण्याचे काम मोहम्मद रफिक नदाफ यांनी केले. मोहम्मद हे लघु पाटबंधारे विभागात अकाऊंट असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शहरातील विविध ठिकाणी जावून सेवा बजाविणाऱया पोलिसांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले.
नाईट कर्फ्यू की कडक निर्बंध?
शुक्रवारी रात्री नऊपासून सुरू असलेला वीकेंड कर्फ्यू सोमवारी सकाळी 6 वाजता संपणार आहे. यापूर्वी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवारपर्यंत केवळ रात्रीचा कर्फ्यू असणार की आणखी निर्बंध अधिक कडक करणार, हे सोमवारी ठरणार आहे.
दरम्यान, रविवारी नियम मोडून अनावश्यकपणे फिरणारी 92 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वीकेंड कर्फ्यूमध्ये भाग घेतला आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेत अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सूट होती. त्याचवेळेत खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले होते.
प्रमुख मार्गांवरून बॅरिकेड्स उभे करून रस्ते अडविण्यात आले होते. मात्र, नागरिकांच्या सहकार्यामुळे रविवारी पोलिसांना कर्फ्यूसाठी फार परिश्रम घ्यावे लागले नाहीत. सोमवारी मंत्रिमंडळ बैठक होणार असून बेंगळूरसाठी कर्फ्यू जारी ठेवण्याची शक्मयता आहे. बेंगळूर वगळता राज्यातील इतर भागात केवळ नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला तर सोमवारी दिवसभर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.