जीसीपीसी चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गडहिंग्लज येथे सुरू असलेल्या जीसीपीसी चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमी बेळगाव संघाने कोल्हापूर संघाचा 7 गडय़ाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 70 धावा करणाऱया आशुतोष हिरेमठला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
या उपांत्य सामन्यात कोल्हापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी बाद 115 धावा केल्या. त्यात ओंम मोहितेने 5 चौकारासह 47, अर्णव पाटीलने 3 चौकारासह 26 धावा केल्या. विजया अकादमीतर्फे स्वरूप साळुंखेने 20 धावात 3, स्वयं वड्डेबैलकरने 2 तर बीलाल व साईराज साळुंखे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल विजया क्रिकेट अकादमीने 17 षटकात 3 गडी बाद 106 धावा करून सामना 7 गडय़ाने जिंकला. आशुतोष हिरेमठने 2 षटकार 6 चौकारासह 70, नवीन बेकवाडकरने 2 चौकारासह 18 धावा केल्या. कोल्हापूरतर्फे सोहमने 2 गडी बाद केले. या स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे.