विजापूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना राज्यांमध्ये म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचं सावट गडद झालं आहे. दरम्यान कर्नाटकातही ब्लॅक फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २५० च्या वर आहे. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ब्लॅक फंगसची अनेक प्रकरणं समोर आली आहे. ब्लॅक फंगसची लागण होत असल्याने डॉक्टरही चिंतातूर झाले आहेत. राज्यात या परिस्थितीवर डॉक्टर नजर ठेवून आहेत. दरम्यान विजापूरमध्ये, ब्लॅक फंगसची प्रकरणे वाढत आहेत. एकट्या विजापूरमध्ये ब्लॅक फंगसची ८३ प्रकरणे समोर आली आहेत. तर यापैकी १३ जण ब्लॅक फंगस या आजारातून बरे झाले आहेत. अशी माहिती विजापूरचे जिल्हाधिकारी पी. सुनीलकुमार यांनी दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्रच्या अन्य जिल्ह्यांमधून विजापूरमधील रुग्णालयात १२ रुग्णांवर उपचार आहेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत, ब्लॅक फंगसमुळे कोणताही रुग्ण दगावलेला नाही. सध्या ब्लॅक फंगसच्या ५८ रुग्णांवर, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. सरकारकडून अजून यावर औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे रुग्णांवर वेगवेगळी उपचार पद्धती अवलंबून, उपचार करण्यात येत आहेत. काही जण यातून बरे होऊन घरी परतले आहेत.