अनाथाश्रमांना दिवाळीनिमित्त फराळ-कपडे भेट
प्रतिनिधी /बेळगाव
अनाथालयातील व्यक्तींना दिवाळीचा आनंद साजरा करता यावा, या उद्देशाने मराठी विद्यानिकेतन शाळेच्यावतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. हिंडलगा येथील होम फॉर होमलेस व उद्यमबाग येथील अन्नपूर्णा सेवा संस्थेतील गरीब मुलांना दिवाळीचा फराळ व कपडे भेट देण्यात आले.
शाळेने विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी फराळ व कपडे शाळेमध्ये जमा केले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीचे मूल्य रुजावे, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे यांनी अन्नपूर्णा संस्थेचे मोहन कुंभार यांच्याकडे फराळ सुपूर्द केला. शाळेतील शिक्षकांनी इव्हॉन लोमॅक्स यांच्या आश्रमाला भेट देऊन फराळाचे वाटप केले. यावेळी गजानन सावंत, प्रसाद सावंत, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.