मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण : छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
पणजी : गोवा घटक राज्य दिन समारंभात सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा ‘गोमंत विभूषण पुरस्कार’ लोककला क्षेत्रातील विनायक विष्णू खेडेकर 2019-20 आणि पं. प्रभाकर जनार्दन कारेकर यांना भारतीय शास्त्राrय संगीत क्षेत्रातील 2021-22 वर्षासाठीचा पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कला आणि संस्कृती संचालनालयाने माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा दोना पावला येथील राजभवनातील दरबार सभागृहात पार पडला. पुरस्कार वितरणासोबतच मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विनायक विष्णू खेडेकर आणि पं. प्रभाकर जनार्दन कारेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात दोन्ही पुरस्कार विजेत्यांच्या विलक्षण प्रवासाची माहिती देणारे माहितीपट दाखविण्यात आले. समारंभात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवीन पिढीच्या कलागुणांना वाव देण्याचे आणि सर्व क्षेत्रांतील प्रगतीला चालना देण्यावर भर दिला. ते म्हणाले, व्यक्तींची कला आणि कर्तृत्व ओळखणे हा गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्यामागील आमचा उद्देश आहे. गोव्यामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक संधींचा खजिना आहे आणि त्याचा वापर प्रत्येक तऊणाने आपल्या राज्याला अभिमान वाटावा यासाठी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. सरकार आपले राज्य, त्याची संस्कृती, परंपरा आणि व्यक्तींच्या विकासासाठी सर्व ते सहकार्य देईल, असे ते म्हणाले.
कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी गोवा ही भारताची सांस्कृतिक राजधानी असल्याचे सांगून आपला समृद्ध वारसा जतन करणे आणि तो तऊण पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. तऊणांनी आपल्या गुरुंचा सन्मान केला पाहिजे आणि वैयक्तिक वाढ आणि यश मिळवून त्यांची परतफेड केली पाहिजे, असे असे सांगितले. दोन्ही पुरस्कार विजेते विनायक विष्णू खेडेकर आणि पं. प्रभाकर जनार्दन कारेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. विनायक विष्णू खेडेकर यांना गोमंत विभूषण पुरस्काराचे प्रशस्तिपत्र डॉ. अजय वैद्य यांच्या हस्ते व पं. प्रभाकर जनार्दन कारेकर यांना डॉ. पांडुरंग फळदेसाई यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जलस्त्राsतमंत्री सुभाष शिरोडकर, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिगंबर कामत, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, आयएएस, माहिती संचालक दिपक बांदेकर आणि कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले आणि कला व संस्कृती सचिव मेनिनो डिसोझा, आयएएस यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. माहिती आणि प्रसिध्दी सचिव सुभाष चंद्र, आयएएस, यांनी आभार मानले.