काही कार्यकर्ते सेल्फी काढण्यात व्यस्त
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात महागडय़ा सुरुबन हॉटेलमध्ये विमा कर्मचाऱयांच्या पश्चिम विभागाचे अधिवेशनात पार पडले. या मेळाव्यासाठी पश्चिम विभागातील कर्मचाऱयांनी मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावली होती. मात्र, या अधिवेशनात प्रामुख्याने मुख्य वक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कार्यकाळावर टीकेची झोड उठवत होते. मात्र, त्या प्रमुख मान्यवरांच्या भाषणांऐवजी माण तालुक्यातील पळशी येथून आलेल्या बांधवांनी सादर केलेल्या गजी नृत्यांनीच लक्ष वेधून घेतले. वा गमरे साहब बहोत खुब तुम्हारे गावचा फोक डान्स, असा हिंदीत त काहींनी इंग्रजीत कौतुकाचा वर्षाव केला.
विमा कर्मचारी संघटनेचा पश्चिम विभागाचे 23 वे अधिवेशनाच्या निमित्ताने जोरदार नियोजन केले होते. हॉटेल सुरुबन येथील पार पडलेल्या अधिवेशनात सकाळच्या सत्रात शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर प्रत्यक्ष मेळाव्यास सुरुवात झाली. मेळाव्याच्या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्याच प्रतिमा ठिकठिकाणी लावल्या होत्या. परंतु त्याऐवजी लाल फुलांच्या अक्षरात आय लव्ह ए.आय.आय.ई.ए. असा मजकूर लिहलेल्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी चढाओढ लागली होती. सगळय़ांनी लाल रंगाचे शर्ट परिधान केले होते. मेळाव्याची उद्दीष्ठ एल.आय.सी व सार्वजनिक क्षेत्राच्या खाजगीकरणास विरोध, सर्व क्षेत्रात नोकर भरती झालीच पाहिजे, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अधिक सरकारी गुंतवणूक करा, जुनी पेन्शन योजना व पेन्शनमध्ये सुधारणा लागू करा, कौटुंबिक पेन्शन योजना व पेन्शन कायद्यात सुधारणा करा, मालकधार्जिणे नवीन कामगार कायदे रद्द करा, सर्व योजना कर्मचारी, कंत्राटी व इंगामी कामगारांना कायम करा, विमा हप्त्यावरील जीएसटी रद्द करा, राज्य घटना व लोकशाहीचे रक्षण करा, आदी होती. परंतु त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसे वाईट आहेत. त्यांच्याकडून लोकांच्यावर कसा अन्याय होत आहे, हेच बिंबवण्याचे काम उपस्थित मान्यवरांकडून सुरु होते. मात्र, या मेळाव्यात अखिल भारतीय आयुर्विमा महामंडळ कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस श्रीकांत मिश्रा, झोनल प्रेसिडेंट अनिल डोकपांडे, झोनल सेक्रेटरी हितेंद्र भट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर, आर. एन. पटणे, प्रा. कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, वसंतराव नलावडे, सर्जेराव भुजबळ, संजय चव्हाण उपस्थित होते.
खरी कला सादर करणाऱयांचा आयोजकांकडून विसर
पत्रकार परिषदेनंतर माण तालुक्यातून आपल्या गावातल्या एलआयसीतील अधिकाऱयाच्या प्रेमाखातर आलेल्या बांधवांनी मनसोक्त गजीनृत्य सादर केले. ते गजीनृत्य पाहण्यासाठी आलेल्या विमा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची मरगळ कुठे पळून गेली. काहींनी तर आपल्या मोबाईलमध्ये गजीनृत्याचा डाव चित्रीकरण केला. तर काहींनी त्या डावासोबत सेल्फी घेतला. मात्र, ते गजीनृत्य ज्या बांधवांनी सादर केले. त्यांचा विसर आयोजकांना झाल्याची जोरदार चर्चा अधिवेशनाच्या ठिकाणी सुरु होती.