यशवंत आमोणेकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / सावंतवाडी:
विलवडे येथे बेकायदेशीर काळा दगड गौण खनिज उत्खनन करून शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडविण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विलवडे ग्रामस्थ यशवंत आमोणेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात आमोणेकर यांनी काळय़ा दगडाच्या उत्खननासंदर्भात सविस्तर विवेचन केले आहे.