प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव कार्यक्षेत्रातील वीज ग्राहकांनी 100 रुपयापेक्षा अधिक वीज बिल शिल्लक ठेवून घेतली असल्यास त्यांनी हे बील तात्काळ भरावे. अन्यथा त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा हेस्कॉमच्यावतीने देण्यात आला आहे.
हेस्कॉम शहर उपविभाग-2 च्यावतीने हा इशारा देण्यात आला आहे. 100 रुपयापेक्षा अधिक वीजबिल शिल्लक ठेवलेल्या वीज ग्राहकांसाठी हेस्कॉमच्यावतीने वीज पुरवठा बंद करण्याचा अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत अशा ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांनी हेस्कॉमला अशा प्रकाराची संधी न देता आपले शिल्लक बिल भरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.