वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह कॅम्प या सिंधुदुर्गातील प्रथम वातानुकुलीत सभागृहामध्ये प्रो फिटनेस व्यायामशाळा वेंगुर्ला तर्फे दि. 30 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत जिल्हास्तरीय वेंगुर्ला ‘श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास पारितोषिक रु. १०,०००/-, मोस्ट इम्प्रूव्हरसाठी रु. ५०००/-, बेस्ट पोजर साठी रु. ३०००/- तसेच ग्रुप विनरसाठी रोख रक्कम तसेच कायम स्वरूपी चषक देण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा शासनाच्या कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत जिह्यातील व्यायाम पटूंनी सहभागी व्हावे. यास्पर्धेच्या अधिक माहिती साठी व नावनोंदणी साठी 9422054799 यांचेशी संपर्क साधावा लाभ असे आवाहन प्रो फिटनेस जिम वेंगुर्ला तर्फे राजेश हिरोजी यांनी केले आहे.