व्हॉट्सऍप वापरकर्त्यांची प्रचंड संख्या आणि व्हॉट्सऍपचा अनेक कारणांसाठी होणारा वापर लक्षात घेता व्हॉट्सअप वापरकर्ते असुरक्षित बनत आहेत. व्हॉट्सऍपची फसवणूक म्हणजे काय, व्हॉट्सऍप घोटाळे कसे ओळखता येतील आणि ते कसे रोखता येतील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. व्हॉट्सऍप प्रेंड/फॅमेली एमर्जन्सी फ्रॉडमध्ये आपल्या एखाद्या परिचिताला अचानक व्हॉट्सऍपवर एक मेसेज येतो की मला तातडीने पैसे पाठव, माझे पाकिट/पर्स चोरीला गेली आहे व मला पेमेंट करायचे आहे. सायबर गुन्हेगार हा मेसेज मित्र किंवा कुटुंबातील सदस्याचा असल्याचे भासवून पाठवितात. बऱयाचदा खात्री न करता, आपल्या ओळखीचा, परिचित आहे असे समजून पैसे पाठविलेही जातात. काही वर्षापूर्वी याच प्रकारचे मेसेज ई-मेलवरून येत असत. आता प्लॅटफॉर्म बदलून म्हणजे व्हॉट्सऍपचा वापर करताना आढळतात. सहसा, गुन्हेगार घाईघाईत असल्याची बतावणी करतात आणि बहुतेक वेळा पीडितांना त्वरित पैसे पाठविण्यासाठी उद्युक्त करतात. म्हणूनच या प्रकारच्या फसवणुकीस प्रेंड/फॅमेली एमर्जन्सी फ्रॉड म्हटले जाते. दुर्दैवाने, व्हाट्सऍप घोटाळय़ांमध्ये सरासरी बळी पडलेल्यांनी हजारोनी रक्कम गमावली आहे. बऱयाचदा या फ्रॉडमध्ये पीडित 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. कारण ते जास्त भावनिक असतात आणि भावनेमध्ये विचार न करता पैसे पाठवितात. हा फ्रॉड करण्यासाठी गुन्हेगाराद्वारे वापरलेला फोन हा नवीन असतो मात्र त्याचे प्रोफाईल पिक्चर ओळखीचे असते. बहुतेक वेळा नंबर न पाहता प्रोफाईल पिक्चरवरून मेसेज पाठविण्यात येत असतात आणि गुन्हेगार याचाच फायदा घेतात. हे प्रोफाईल पिक्चर फेसबुक, इन्स्टाग्रामवरून घेण्यात येते आणि हे पिक्चर वापरून दिशाभूल करून फसविले जाते. सुरुवातीला अगदी घरच्यासारखे मेसेज पाठविले जातात व अचानक पैशाची अडचण भासवत मागणी करतात.
व्हॉट्सऍप हायजॅकिंग हा सध्या नवीन प्रकार समोर येत आहे. येथे एखाद्याचे व्हॉट्सऍप अकाऊंट हॅक करायचे. हे थोडे प्रगत आहे. मात्र या प्रकारामध्येसुद्धा आता सराईतपणा आला असून बरेच जण फसले जात आहेत. मग हे नेमके घडते कसे. फसवणूक करणारा त्याच्या टेलिफोन नंबर प्राप्त करतो. सायबर गुन्हेगारी त्याच्या फोनवर किंवा दुसऱया डिव्हाइसवर व्हॉट्सऍप इन्स्टॉल करतो. गुन्हेगार पीडिताशी संपर्क साधून पीडित व्यक्तीच्या ओळखीची तोतयागिरी करतो. व्हॉट्सऍप फसवणूक करणारा पीडित व्यक्तीला फोन करून सांगतो की चुकून त्यांनी व्हेरिफिकेशन कोड पाठविला आहे तरी तो कोड कृपया सांगा की जेणे करून मी माझे व्हॉट्सऍप इन्स्टॉल करू शकेन. हा कोड प्राप्त झाल्यावर गुन्हेगाराच्या फोनवर पीडिताचे व्हॉट्सऍप इन्स्टॉल होते व संपूर्ण व्हॉट्सऍपचा एक्सेस मिळतो. मुळात हे ओळखणे थोडे कठीण आहे. अनरीड मेसेज रीड झालेले दिसणे, सेंड मेसेज असणे इ. बाबीवरून लक्षात येऊ शकते. दुसरे म्हणजे एखादा पैशाचा व्यवहार करावयाचा असल्यास गडबड, घाई करणे, सारखे फोन अथवा मेसेज पाठवून दबाब आणण्याचा प्रयत्न करणे. अनोळखी अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणेसाठी विनंती करणे किंवा आपल्याला पेपल, फेसबुक मेसेंजर पेमेंट्स, गुगल पे, कॅश ऍप किंवा इतर कोणत्याही इ-वॅलेटमध्ये ऍप्सद्वारे पैसे हस्तांतरित करण्यास सांगणे. कोणत्याही परिस्थितीत, या प्रकारच्या देयक विनंत्यांना प्रतिसाद देताना तपासणी करणे आणि संशयास्पद लिंक्सना प्रतिसाद न देणे आवश्यक आहे.
भुलवणाऱया असंख्य जाहिराती व ऑफर्स व्हॉट्सऍपवर येत असतात. या जाहिरातीबरोबर एक लिंक दिलेली असते व या लिंकवर क्लिक करून आपले बक्षीस मिळवा असे सांगितलेले असते. आपण जेव्हा ही लिंक ओपन करतो तेव्हा यामध्ये आपले नाव, पत्ता, फोन, बँक अकाऊंट माहिती विचारलेली असते. ही माहिती भरून सबमिट करतो. एकदा का ही माहिती सबमिट केली की ती सर्व त्यांच्याकडे जाते. आपण गिफ्टची वाट बघत बसतो, मात्र गुन्हेगार या माहितीचा वापर करून आपल्याला फसवतो. एक कोड पाठविणे, हा कोड म्हणजे ओटीपी. हा ओटीपी पाठविल्यास पैसे अकाऊंटमधून पेडीट होतात. कदाचित आपल्याला क्मयुआर कोड येतो व स्कॅन करा म्हणून सांगितले जाते. हा कोड स्कॅन केल्यास पैसे गमावले जातात. म्हणून कोणत्याही व्हॉट्सऍपवरून आलेल्या जाहिरातीला फसू नका. तरुण मुले मुली सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह आहेत. प्रेंड रिक्वेस्ट, फॉलो करून, स्वीकारून नवीन ओळख होणे सर्रास सुरू आहे. हीच ओळख पुढे जाऊन फोन नंबरची अदलाबदल पर्यंत होते. मग व्हॉट्सऍपवरून चॅटिंग सुरू होते. व्हीडिओ कॉल सुरू होतात. प्रेमाच्या गोष्टी बोलणे, थोडे पुढे जाऊन अश्लील संभाषण, चाळे करणे इ. सुरू होते. इथे धोका संभावतो. हे व्हीडिओ कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकतात याची अजिबात कल्पना नसते. फसवणारे असे व्हीडिओ कॉल रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग सुरू करतात. पैशाची, शरीरसुखाची मागणी, धमकावणे इ. बाबी सुरू होतात. यातून बाहेर पडणे मुलींना खूप त्रासदायक ठरते. त्यामुळे व्हीडिओ कॉल करताना आपण कोणाशी बोलतो आहोत, काय बोलतो आहोत याची पूर्ण कल्पना असणे आवश्यक असणे गरजेचे आहे. असे व्हीडिओ कॉल सांभाळूनच करावे.
व्हॉट्सऍप फसवणूक म्हणजे काय आणि व्हॉट्सऍप फसवणुकीचे सांगणे-चिन्हे काय आहेत हे समजून घेणे जितके आवश्यक आहे तितकेच या प्रकारच्या फसवणुकीस प्रतिबंध कसा करता येईल हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याकडे पैसे मागण्याचा कोणाकडून मेसेज मिळाल्यास प्रथम फोन बरोबर आहे की नाही ते तपासा. जर आपल्या एखाद्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीकडे अचानक नवीन नंबर आला असेल आणि त्याने आपल्याकडे पैसे मागितले असतील तर त्याला फोन करून खात्री करा व मगच पैसे पाठवा. एक क्षण थांबून मेसेजची भाषा आणि संवाद शैली तपासा. पैसे मागणाऱया व्यक्तीच्या क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न करा. जर तो फसवणारा असेल तर ते कदाचित तुम्हाला लगेच लक्षात येईल. जर त्याने फोन उचलला नाही तर आपल्या मित्रासाठी किंवा ओळखीच्या व्यक्तीला आपल्याकडे असलेल्या ‘जुन्या’ क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी दुसऱया मार्गाने (उदा. ई-मेल, एसएमएस इ.) संपर्क साधा. फसव्या व्यक्तीला आपल्यावर दबाव आणू देऊ नका. आपल्याला संशयास्पद आढळल्यास, समोरच्याल्या असा एक प्रश्न विचारा फक्त आपल्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला त्याचे उत्तर माहीत असेल.
जर एखाद्याने आपल्याला व्हेरीफिकेशन कोड पाठविण्यास सांगितले तर तो कधीही पाठवू नका. व्हेरीफिकेशन कोडची विनंती करणारी व्यक्ती अपरिचित असेल तर अजिबात पाठवू नका. व्हॉट्सऍपवर ‘2-फॅक्टर व्हेरिफिकेशन’ सेट करा. एकदा हे सेटअप झाल्यानंतर, कोणत्याही नवीन डिव्हाइसवर व्हॉट्सऍप इनस्टॉल केल्यास, व्हॉट्सऍप आपण आधी सेट केलेला 6-अंकी व्हेरिफिकेशन कोड विचारेल. जर तो कोणी तिसरीच व्यक्ती तुमचे व्हॉट्सऍप इन्स्टॉल करत असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. व्हॉट्सऍपने सिक्मयुरिटी जपली आहे. मात्र आपल्या वापरण्यामध्ये थोडी निष्काळजी झाली तर फसले जाण्याची शक्मयता अधिक आहे.
विनायक राजाध्यक्ष