ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज पुन्हा हिंसक वळण लागलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक या निवास्थानाबाहेर एसटी कर्मचारी आंदोलन करत असताना अचानक आक्रमक जाहले आणि त्यांनी पवारांच्या निवास्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली आहे.
दरम्यान, एसटी कर्मचारी अचानकपणे आक्रमकम झाले आणि आज शरद पवार यांच्या निवास्थानाच्या आवारात शिरले. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक देखील केली. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारविरोधता जोरदार घोषणाबाजी केली. या ठिकाणी मोजकाच पोलीस बंदोबस्त असल्याने आणि आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बराच गोंधळ देखील उडाला आहे.
दरम्यान, एसटीच्या निलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. कोर्टाचा निर्णय अन्यायकारी असल्याचं त्यांनी म्हटलं. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलीनीकर न होण्यामागचे सूत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारने १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.