प्रतिनिधी/ सातारा
कडक लॉकडाऊनचे निर्णय जारी करून देखिल शहरात विनाकारण फिरणाऱयांची संख्या काही कमी होत नाही. परिणामी कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे शहरात ऑन-दि-स्पॉट कोरोना तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी करंजे येथे दुपारी 12.30 वा. पर्यंत 75 नागरिकांची रॅट टेस्ट करण्यात आली यामध्ये 8 नागरिक कोरोना पॉझेटीव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यात 3 मुलांचा ही समावेश आहे.
सदर तपासणी मोहिम शाहुपुरी पोलीस आणि कस्तुरबा गांधी रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत होती. विविध कारणे देऊन विनाकारण फिरणाऱयांची संख्या काही कमी होत नाही. यातच काही कोरोना वाहक असल्यानेच दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शासना तर्फे घरी रहा सुरक्षित रहा असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे.
शहरात मासिक पाळीसंबंधी रेड डॉट मोहीम गरजेची
सॅनिटरी नॅपकीन चा नुसता वापर नको, योग्य पद्धतीने विल्हेवाट आवश्यक