बेळगाव : शहरातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत, यासाठी शांताई वृद्धाश्रम आणि रोटरी क्लब पुढे आले आहेत. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांसाठी ऍम्बुलन्सची सेवा पुरवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. रुग्णवाहिकेचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. 6 एप्रिल रोजी गुड्सशेड रोड येथील माजी महापौर कार्यालयात पार पडला. यावेळी शांताई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन करून रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी महापौर आणि शांताईचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी वृद्धांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी नागरिकांनी वापरात न येणाऱया वृद्धांच्या गरजेच्या वस्तू शांताईच्या वृद्धाश्रमाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच रुग्णवाहिकेसाठी अमर रामचंद्र चौगुले यांच्याशी 8310751989 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.