प्रतिनिधी / कोल्हापूर
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहूपुरी तिसरी गल्ली येथे भरधाव वेगाने आलेल्या एका कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. कारच्या धडकेत एका विजेच्या खांबासह 2 वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास शाहूपुरीतुन बीटी कॉलेजच्या दिशेन भरधाव वेगाने आलेल्या एका स्विफ्ट कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार विजेच्या खंबावर जाऊन आदळली.कारच्या धडकेत विजेचा खांब रस्त्यावर उखडून पडला. दारात लावलेल्या एका चारचाकी आणि एका दुचाकी मोपेडवरही कार धडकल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
मध्यरात्री घडलेल्या या अपघातानंतर शाहूपुरीतील विजेच्या तारा तुटून परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. अपघाताचा मोठा आवाज आल्याने येथील लोक बाहेर आले. मात्र कार चालक अधाराचा फायदा घेऊन पसार झाला.शाहुपुरी पोलीसात या अपघाताची नोंद झाली नव्हती.