वार्षिक नवीन मंगळवार उत्सव. विविध कार्यक्रमांचे आयोजन
डिचोली/प्रतिनिधी
शिरगाव डिचोली येथील श्री देवी लईराईचा वार्षिक नवा मंगळवार हा लालखी उत्सव येत्या मंगळ. दि. 11 नोव्हे. रोजी विविध कार्यक्रमांनिशी साजरा होणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव गावकर यांनी दिली.
या उत्सवानिमित्त सकाळी 9 वा. लघुरुद्र महापूजा, दुपारी पंचात्रतन देवतास नैवेद्य, संध्याकाळी देवीच्या मंदिरामध्ये गोव्यातील निमंत्रित प्रसिद्ध भजनी कलाकारांची आणि शिरगावातील भजनी कलाकारांची बैठक होणार आहे. तदनंतर लालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार असून लालखी गावामध्ये प्रदक्षिणा मारण्यासाठी नेण्यात येणार आहे. या लालखी मिरवणुकी दरम्यान मानसवाडा, मधलावाडा येथे गोमंतकातील नामवंत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
रात्री 10.30 वा. देवीच्या मंडपात ईश्वर अशोकराव घोरपडे (पुणे) यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 1 वा. श्री रवळनाथ मंदिराच्या मंडपात गोमंतकातील गायिका गितगंधा गुरूदास गाड यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर पहाटे 5 वा. शिरगावातील नामवंत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी देवीच्या सर्व भाविकांनी कोवीड मार्गदर्शक तत्वा?चे पालन करून या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री लईराई देवस्थानचे अध्यक्ष महादेव गावकर यां?नी केले आहे.