4 गाळय़ांच्या माध्यमातून प्रतिमहा 65 हजार भाडे
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात उभारण्यात आलेल्या शिवबसव नगरमधील केपीटीसीएल कार्यालयाशेजारी स्मार्ट रोडवरील गाळय़ासाठी तिसऱयांदा आयोजित करण्यात आलेल्या लिलावात 21 हजार रुपये सर्वाधिक बोली लागली. याठिकाणी असलेल्या 4 गाळय़ांच्या माध्यमातून मनपाला प्रतिमाह 65 हजार भाडे मिळणार आहे.
महापालिकेच्या विविध गाळय़ांच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच काही गाळे नव्याने भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पण अनामत रक्कम वाढविण्यात आल्याने शिवबसव नगरमधील गाळे भाडेतत्वावर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी होती. या परिसरात शाळा, महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालय आणि वैद्यकिय महाविद्यालये असल्याने या परिसरातील गाळय़ांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे मागील वषी लिलावावेळी 33 हजार बोली लावण्यात आली होती. पण गाळेधारकांनी अनामत रक्कम भरणा केली नसल्याने तिसऱयांदा लिलाव आयोजित करण्यात आला होता.
स्मार्ट रस्त्यावर असलेल्या 14 पैकी 4 गाळय़ांकरिता लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेवेळी प्रत्येक गाळय़ांकरिता 4 नागरिकांनी सहभाग घेतला होता. गाळय़ांना अधिक मागणी असल्याने 21 हजार रुपयापर्यंत बोली लागली. यावेळी 4 गाळय़ांसाठी बोली लावण्यात आली. त्यामुळे महापालिकेला येथील चार गाळय़ांच्या माध्यमातून प्रति महिना 65 हजार रुपये भाडे मिळणार आहे. तसेच चक्हाट गल्ली येथील दवाखान्याची इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित केला होता. पण लिलावदरम्यान कोणीच सहभाग घेतला नसल्याने गाळय़ाला भाडेकरू मिळाला नाही.
लिलाव प्रक्रियेवेळी महापालिकेचे महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी, कायदाअधिकारी यु. डी. महांतशेट्टी, बाबू माळण्णावर, सुशांत कांबळे, व्यवस्थापक फारुक यड्रावी, महसूल निरीक्षक मलिकार्जून गुंडपण्णावर आदीसह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.