सकल मराठा समाजाची मागणी, पोलीस आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
समाजमाध्यमावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या घटनेने बेळगावात संतापाची लाट उसळली आहे. सकल मराठा समाज, शिवप्रति÷ानसह वेगवेगळय़ा संघटनांनी याचा निषेध केला असून दोषींवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
‘स्थलांतरितांना हटवा, कर्नाटक वाचवा’ या फेसबुक पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही पोस्ट व्हायरल होताच संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी सीईएन पोलीस स्थानकासमोर आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयासमोरही धरणे धरण्यात आले.
स्वत: पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी निवेदन स्वीकारून राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे तर इन्स्टाग्रामवर क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा अवमान करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
समाजमाध्यमावर राष्ट्रपुरुषांच्या अवमानाचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी झालेल्या आंदोलनात प्रकाश मरगाळे, शिवप्रति÷ानचे किरण गावडे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, जयराज हलगेकर, रणजित चव्हाण-पाटील, गणेश दड्डीकर, प्रकाश शिरोळकर, सुनील जाधव, अजित जाधव, मदन बामणे, बंडू केरवाडकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या. सीईएन पोलीस स्थानकात मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी निवेदन स्वीकारले. त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून धरणे धरण्यात आले. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पिरनवाडी येथे क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळा बसविण्यावरून उद्भवलेला वाद गावकऱयांच्या सहभागातून मिटतो न मिटतो तोच समाजमाध्यमावर राष्ट्रपुरुषांच्या अवमानाचा सपाटा सुरू झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात बेळगावच्या शांततेला सुरुंग लावण्याचे प्रकार सुरू असून त्यामुळे पोलिसांनी समाजमाध्यमावर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
अवमान करणाऱयावर कडक कारवाई- डॉ. त्यागराजन
समाजमाध्यमावर राष्ट्रपुरुषांचा अवमान करून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे प्रयत्न हाणून पाडून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिला आहे. नागरिकांनी समाजात तेढ निर्माण होईल असे पोस्ट व्हायरल करू नयेत. त्याच्यावर विश्वासही ठेवू नये. ते कोणीही पुढे पाठवून नयेत. या प्रकरणी एकूण दोन एफआयआर दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱयांसंबंधी नागरिकांनी पोलीस कंट्रोल रुमला माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.