वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया शेफिल्ड युनायटेड क्लबच्या फुटबॉलपटूंनी देशातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या वेतनश्रेणीच्या रक्कमेत तसेच बोनस रक्कमेच्या कपातीला आपली कबुली दिली आहे. सदर निर्णय शेफिल्ड युनायटेड संघाच्या खेळाडूंनी मंगळवारी घेतला.
शेफिल्ड युनायटेड क्लबचे व्यवस्थापक ख्रिस विल्डेर तसेच या क्लबचा प्रशिक्षण वर्ग आणि सीईओ स्टीफेन बेटीस यांच्यासह या क्लबच्या खेळाडूंनी सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या वेतनात तसेच बोनस रक्कमेत कपात करण्यास तयारी दर्शविली आहे. वेस्टहॅम युनायटेड, अर्सेनेल या फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी आपल्या वेतनश्रेणीमध्ये 12.5 टक्के रक्कम कपात करण्याला मान्यता दिली आहे.