तीन वर्षांचा मिळणार कालावधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या ऑईल इंडियन ऑईल कॉरपोरेशन (आयओसी)च्या अध्यक्षपदी श्रीकांत माधव वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रीमंडळ समितीने त्यावर शिक्कामोर्तब करत नियुक्ती केली आहे. येत्या 1 जुलै रोजी ते पदभार स्वीकारतील. त्यांना 31 ऑगस्ट 2023पर्यंतचा कार्यकाल मिळणार आहे.
वैद्य सध्या आयओसीच्या रिफायनरी विभागामध्ये संचालक आहेत. गेल्यावर्षी सार्वजनिक उपक्रम निवड समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. यासाठी पाच उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर ही निवड केली आहे. वैद्य यांच्याशिवाय आयओसीचे वित्त संचालक संदीपकुमार गुप्ता, मनुष्यबळ विकास संचालक रंजनकुमार महापात्र आणि संशोधन विभागाचे संचालक एसएसव्ही रामकुमार तसेच कंपनीचे कार्यकारी संचालक राहुल भारद्वाज यांचीही मुलाखत घेण्यात आली होती. यातून वैद्य यांची निवड केली असून विद्यमान अध्यक्ष संजीवसिंह यांच्या निवृत्तीनंतर ते पदभार स्वीकारतील. त्यांना ऑगस्ट 2023 पर्यंतचा कार्यकाल मिळणार आहे.