ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 08 हजार 910 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 12 लाख 95 हजार 023 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर अजूनही 04 लाख 52 हजार 647 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 62 हजार 258 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 30 हजार 386 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 291 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 61 हजार 240 एवढी आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 5 कोटी 81 लाख 09 हजार 773 जणांना लस देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत 23 कोटी 97 लाख 69 हजार 553 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 64 हजार 915 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.26) करण्यात आल्या.