वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियातील झालेल्या वणवा दुर्घटनेत बळी पडलेल्यासाठी प्रदर्शनीय मदतनिधी क्रिकेट सामना आयोजित करण्यात येणार आहे. या सामन्यात विविध देशांचे क्रिकेटपटू सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. ऑस्ट्रेलियातील बुशफायर्सतर्फे हा मदतनिधी सामना आयोजित केला आहे. शेन वॉर्न आणि रिकी पाँटींग हे दोन संघांचे कर्णधार राहतील. सचिन तेंडुलकर आणि विंडीजचा कोर्टनी वॉल्श यांच्याकडून या दोन्ही संघातील खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू गिलख्रिस्ट, ब्रेट ली, मायकेल क्लार्क, शेन वॅटसन सहभागी होत आहेत. हा प्रदर्शनीय सामना 8 फेब्रुवारीला आयोजित केला जाईल.