प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील नागरिकांसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या सत्तरी तालुका शेतकरी संस्थेच्या संचालक मंडळासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत एकूण 21 टक्के मतदान झाले आहे मतदाराचा अल्प प्रतिसाद लाभल्यामुळे प्रोग्रेसिव पॅनल व विकास पॅनल यांचे भवितव्याचा उलगडा सोमवारी होणाऱया मतमोजणीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे.
एकूण अकरा संचालक पदासाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत .सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून सत्तरी तालुका शेतकरी संस्थेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुका शेतकरी संस्थेच्या संचालक मंडळासाठी आज मतदान घेण्यात आले सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला संध्याकाळी 5 वाजता मतदान बंद झाले. एकूण 21 टक्के मतदान झालेले आहे ही संस्था ताब्यात घेण्यासाठी एकूण 18 उमेदवार रिंगणात असून याचा फैसला सोमवारी होणाऱया मतमोजणीच्या माध्यमातून होणार आहे.
या निवडणुकीत एकूण दोन गट परस्परविरोधी उभे ठाकलेले आहेत. यात प्रोग्रेसिव पॅनल व विकास पॅनल यांचा खास करून समावेश आहे। निवडणूक अधिकारी म्हणून पंकज मराठे यांनी चांगल्या प्रकारे यंत्रणा हाताळली. एकूण चार मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले सतरी तालुका शेतकरी संस्था ही सत्तरी तालुक्मयातील अनेक शेतकरी व नागरिकांशी सलग्नीत राहिलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेले आहेत.
दरम्यान दोन्ही गटाकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. विकास पॅनलचे प्रमुख पांडुरंग गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार आज घेण्यात आलेल्या मतदानातून या केंद्राचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराशी वैयक्तिकपणे संवाद साधण्यात आला होता. त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला होता. यामुळे या पॅनेलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येऊन ही संस्था या पॅनलच्या ताब्यात येणार असल्याचा दावा केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रोग्रेसिव पॅनलचे प्रमुख अँड. गणपत गावकर यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पँनलचे सर्व उमेदवार निवडून देऊन या संस्थेवर सत्ता स्थापन करण्यात येईल. दरम्यान पंकज मराठे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची आशा व्यक्त केलेली आहे.मतमोजणीची पूर्ण तयारी करण्यात आली असून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे पंकजा मराठे यांनी यावेळी स्पष्ट केले.