सुमारे तीन लाखांच्या नुकसानीचा अंदाज : केरी, मोर्ले, पर्ये आदी भागांमध्ये कृषी बागायतीची व नैसर्गिक पडझड.
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा भागांमध्ये आज अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत बनले. केरी शिरोली मोर्लै आदी भागांमध्ये चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून शिरोली भागामध्ये सर्वात जास्त नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.अग्नीशमन दलाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण 14 ठिकाणी पडलेली झाडे रात्री उशिरापर्यंत हटविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी काही प्रमाण सुटकेचा श्वास सोडला .दरम्यान केरी पर्ये मोर्ले पंचायत क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात कृषी बागायतीचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे .
याबाबतची माहिती अशी की आज सकाळपासून सत्तरी तालुक्मयात प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. त्यामुळे संध्याकाळी पाऊस हजेरी लावणार हे निश्चित झाले होते. दुपारी जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास अनेक गावांमध्ये पावसाच्या सरीत कोसळण्यास प्रारंभ झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात वादळी वारा होऊन प्रचंड प्रमाणात पाऊस लागला. यामुळे हवामानात गारवा निर्माण झाला. मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले . सत्तरीतील जवळपास सर्वच भागांमध्ये सोसाटय़ाचा वारा वाहू लागल्यामुळे नैसर्गिक स्तरावर बऱयाच प्रमाणात पडझड झाली.
केरी,मोर्ले,पर्यै आदी भागात जास्त फटका.
एकूण प्राप्त झालेल्या माहितीनुसार चक्री वादळाचा मोठा फटका सत्तरी तालुक्मयातील केरी, मोर्लै, पर्ये आधी पंचायत क्षेत्राना बसल्याचे समजते. केरी पंचायत क्षेत्रातील केरी शिरोली आदी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात झाडे पडल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे . शिरोली भागांमध्ये प्रमुख रस्त्यावर झाडे पडल्यामुळे गावात जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. त्याचप्रमाणे घोटेली याठिकाणी राजाराम माजिक यांच्या संरक्षण कुंपणावर आंब्याचे झाड पडल्यामुळे नुकसानी झाली. त्याचप्रमाणे केरी बाहेरीलवाडा या ठिकाणी अर्जुन गावस यांच्या घरावर माडाचे झाड पडल्यामुळे नुकसान झाले आहे .केरी श्री सातेरी आजोबा देवस्थाना नजीक मोठे झाड पडल्यामुळे बऱयाच प्रमाणात पडझड झाल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे वीजेची मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून रात्री उशिरापर्यंत झाडे कापून रस्ता मोकळा करणे व वीजपुरवठा पूर्वपदावर येण्यासाठी बऱयाच प्रमाणात काम सुरू होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
अग्निशमन दलाची दमदार कामगिरी.
दुपारी जवळपास अडीच वाजण्याच्या सुमारास केरी भागांमध्ये चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक पडझड झाल्याची माहिती वाळपईच्या अग्निशमन दलाच्या यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर अधिकारी प्रशांत धारगळकर व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन वेगवेगळय़ा ठिकाणी निर्माण झालेली पडझड दूर करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले .प्राप्त झालेल्या माहितीनुसार जवळपास चौदा ठिकाणी वेगवेगळय़ा रस्त्यावर झाडे पडली होती व अनेकांच्या घरावर झाडे पडून मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली होती. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाच्या यंत्रणेचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू होते. एकूण प्राप्त माहितीनुसार केरी, मोर्ले व पर्ये भागामध्ये जवळपास तीन लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात घरावर झाडे पडून व वीज वाहिन्यांची मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊन हा मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसल्याचे समजते.
कृषी बागायतीची नुकसानी.
जवळपास अर्धा तास केरी मोर्ले व पर्यै भागांमध्ये चक्रीवादळाचा फटका बसला यामुळे नैसर्गिक पडझड व सोसाटय़ाचा वारा जोरदारपणे वाहू लागल्यामुळे भागातील केळी नारळ आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. सध्यातरी आंबा उत्पादन पिकु लागल्यामुळे आजच्या या चक्रीवादळामुळे याउत्पादनाचे बऱयाच प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. हल्लीच पंधरा दिवसांपूर्वी अशाच प्रकारे सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा भागांमध्ये चक्रीवादळाचा फटका बसून प्रचंड प्रमाणात नुकसानी झाली होती. हा फटका भिरोंडा, सावर्डे, गुळेली,नगरगाव पंचायत क्षेत्राना बसला होता.