वृत्तसंस्था / लंडन
एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रातील रेड बुल संघाने 2022 पर्यंत आपल्या सदस्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही या संघातील सर्जिओ पेरेझ, हॅमिल्टन, मॅक्स व्हर्स्टेपन, हुलकेनबर्ग हे सदस्य 2022 पर्यंत कायम राहणार असल्याची माहिती या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
सर्जिओ पेरेझने आपल्या पहिल्या एफ-वन मोटार रेसिगं हंगामाला अव्वल संघातून प्रारंभ केला. त्याने आपल्या दुसऱया ग्रा प्रि मोसमामध्ये झालेल्या पहिल्या पाच शर्यतीमध्ये दर्जेदार कामगिरी केली. बाकू येथे झालेल्या शर्यतीमध्ये पेरेझने आपल्या संघाला पहिला विजय मिळवून दिला. पेरेझने 104 गुण मिळविले असून मर्सिडीस संघातील बोटासपेक्षा 4 गुणांनी पिछाडीवर आहे. रेड बुल संघाबरोबर पेरेझ 2022 सालापर्यंत राहील. एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रातील पेरेझचा 2022 सालातील 11 वा रेसिंग हंगाम असणार आहे.