प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वरातील शासकीय दुग्धशाळेतील सर्वात उंच निवडुंगअशी ख्याती झालेला सुमारे 47 फूट उंच व ज्याची ख्याती भारतातील सर्वात उंच निवडुंग म्हाणून लिंमका बुक मध्ये नोंद झाली तो वार्धक्याने नुकताच पडला. पण याच निवडुंगाच्या झाडाने सुमारे दोन वर्षांपूर्वी दोन कोंबाना जन्म दिला त्यातील एक कोंब सध्या सुमारे 25 फूट वाढला असून दुसरा सुमारे 20 फूट वाढल्याचे दिसत आहे . ते दोन्ही ही कोंबांचे आता युवा निवडुंगाच्या झाडात रूपांतर झाले असून हि दोन्ही निवडुंगांची झाडे झपाटय़ाने वाढत आहेत तसेच ते आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून आकाशकाला गवसणी घ्यालण्याच्या प्रयत्नात आहे . हे दोन्ही निवडुंग भारतातील सर्वात उंच निवडून म्हणून नावारूपाला येतील असा विश्वास सध्या त्याची जोपासना करणारे या दुग्ध शाळेचे कर्मचारी नामदेव मोरे यांना वाटते . सध्या त्यांची वाढ झपाटय़ाने होत असून आपल्या वडिलांचाच उंची बाबतचा विक्रम मोडणार का? या बद्धल कुतुहल निर्माण झाले आहे.
महाबळेश्वरमध्ये सुमारे 50 वर्ष जुनी शासकीय दुग्धशाळा आहे.सध्या हि दुग्धशाळा बंद आहे. होती याच शासकीय दुग्धशाळेच्या विश्राम गृहाच्या प्रवेशद्वाराजवळच सुमारे 47 फुट उंचिचा निवडुंग होता . तो 37 फुट उंचीचा असताना 2007 साली भारतातील सर्वात उंच निवडुंग म्हणून याची नोंद लिमका बुक ओफ रेकार्डमध्ये झाली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याच्या मुख्य खोडाच्या तळातून दोन कोंब फुटले . सध्या . यातील एक 20 फूट उंच तर दुसरी युवा फांदी सुमारे 25 फूट वाढली आहे .सध्या त्यांची झपाटय़ाने वाढ होत आहे व हे दोन्ही हि निवडुंग आता आकाशाकडे उंच उंच झेपावत असून तेही भारतातील उंच निवडुंग म्हणून नावारूपाला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे .हा निवडुंग आकाशात किती उणचं भरारी घेतो या कडे अभ्य्साकांचे लक्ष असून तो येथील कुतूहलाचा विषय झाला आहे.