अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार, 28 सप्टें.2021 स. 11.15
● सोमवारी रात्री अहवालात 150 बाधित
● एकूण 7,217 जणांची तपासणी
● पॉझिटिव्हिटी दर 2.08 टक्के
● जिल्ह्यात लसीकरण गतीने सुरू
● लसीकरण 25 लाखांच्यानजीक
सातारा / प्रतिनिधी :
गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाधित वाढीला चांगलाच ब्रेक लागलेला आहे. शनिवारी 141, रविवारी 147 आणि सोमवारी रात्रीच्या अहवालात 150 अशी बाधित वाढ समोर आली असली तरी ती दीडशेच्या खाली राहिल्याचा मोठा दिलासा सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्याला लाभला. यामध्ये मृत्यूदर कमी झाल्याने भीतीचे वातावरण कमी झाले असून, जिल्ह्यात लसीकरणाने चांगली गती घेतली असून लसीकरण 25 लाखांचा नजीक आहे. मंदावत चाललेली बाधित वाढ, वाढलेला लसीकरणाचा टक्का, घटलेला मृत्यू दराचा टक्का आणि निचांकी बाधित वाढ या सर्व गोष्टी सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत असल्याचा संदेश देत आहेत.
सोमवारी रात्री अहवालात 150 बाधित
मंगळवारी सकाळी देण्यात आलेल्या सोमवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा नीचांकी बाधित वाढीची नोंद झाली असून फक्त 150 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये एकूण 7 हजार 217 जणांची तपासणी करण्यात आलेली होती. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 20.3 टक्के एवढा खाली आलेला आहे.
जिल्ह्यात लसीकरण 25 लाखांच्यानजिक
कोविन पोर्टलवर असलेल्या नोंदीनुसार आज सकाळी 200 जणांचे लसीकरण झालेले असून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 24 लाख 62 हजार 524 एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिलासादायक लसीकरण झालेले असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 17 लाख 60 हजार 743 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 7 लाख 1 हजार 688 एवढी झालेली आहे.
हॉटस्पॉट तालुक्यांसह जिल्हा सावरला
गत तीन-चार महिन्यांपासून सातारा फलटण, कराड, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा हे तालुके हॉटस्पॉट ठरले होते. मात्र ऑगस्टनंतर बाधित वाढ मंदावत गेली आणि यामध्ये फक्त सातारा, फलटण, खटाव तालुके सातत्याने चिंताजनक ठरत होते. मात्र सप्टेंबरमध्ये सातारा, फलटण, खटाव, कराड सह सगळ्याच तालुक्यात वाढ मंदावत गेली असून यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सातारा जिल्हा सावरू लागला आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 20,56,156
एकूण बाधित 2,47,798
एकूण कोरोनामुक्त 2,38,662
मृत्यू 6,081
उपचारार्थ रुग्ण 5,494
सोमवारी जिल्हय़ात
बाधित 147
मुक्त 463
मृत्यू 00