शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / सांगली
सांगली-मिरज महापालिका क्षेत्रात मंजुरीसाठी येऊ घातलेले एलईडी बल्ब प्रकल्प त्यासंदर्भात काही बदल करून सुमारे २५ कोटीचा निधी वाढवून संपूर्ण महापालिका क्षेत्रात व महापालिका क्षेत्राला जोडणाऱ्या सर्व रस्त्यावर एलईडी बसवावेत व सभेत वाढीव निधी मंजूर करून घ्यावा. यासाठी शिवसेनेच्या वतीने महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले.
मनपाच्यावतीने यासंदर्भात मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, विरोधी पक्षनेते विधानसभा, सांगली जिल्हा पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच प्रधान नगरविकास सचिव यांना प्रत पाठवून तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांना प्रत्यक्ष महापौर, विरोधी पक्ष नेता, स्थायी समिती सभापती, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन प्रत देण्यात आले.
स्थायी समितीत मंजुरीसाठी येवू घातलेला महापालिका क्षेत्रातील एलईडी प्रकल्प महापालिकेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने व शासनाने तात्काळ मंजूर करून सदरचा विषय मार्गी लावावे अशी मागणी करण्यात आली.