तीन दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांत नोंद नाही
डोके व हातावर वार, हल्लेखोर पसार, कारण अज्ञात
प्रतिनिधी / कुपवाड
अज्ञात कारणातून एका हल्लेखोराने घरात घुसुन कुपवाडमधील साहेबराव दगडू पुजारी (रा.बजरंगनगर) यांच्यावर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. हल्ला करून हल्लेखोर पसार झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून याबाबत कुपवाड पोलिसांत अद्याप नोंद झाली नाही.
जखमी साहेबराव पुजारी हे महापालिकेतील कंत्राटी सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. अज्ञाताने पुजारी यांच्यावर केलेल्या तलवार हल्ल्यात डोक्यात व डाव्या हातावर वर्मी घाव बसल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, हल्ल्याची घटना घडून तीन दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांत नोंद नाही आणि हल्लेखोरही सापडला नाही.