सांगली महापालिका क्षेत्रात 19 रूग्ण वाढलेः गवळेवाडी येथील दोघे बाधितः समडोळी येथील बँक अधिकारी बाधितः तुरची येथील ब्रदर बाधितः
प्रतिनिधी/सांगली
मंगळवारी जिल्हय़ात कोरोनाचे नवे 34 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या 1108 वर पोहचली आहे. उपचारातील रूग्णसंख्या 628 झाली आहे. तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 41 झाली आहे.
सांगली-मिरजेत कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले
सांगली शहरात मंगळवारी 14 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये तीन रूग्ण हे शहरातील पॉश आणि राजकीय व्यक्तीची घरे असणाऱया वसंत कॉलनी येथील आहेत. 44 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय युवक बाधित आढळून आला आहे. तर सावली निवारा केंद्रातील 42 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. शाहूनगर-विजयनगर येथील 45 वर्षीय व्यक्ती बाधित आहे. हॉटेल पै प्रकाश येथे असणाऱया 21 वर्षीय युवकालाही लागण झाली आहे. तर मिरजेत शास्त्री चौक येथील 52 वर्षीय महिला, गणेश तलाव मिरज येथील 65 वर्षीय महिला, पिरजादे प्लॉट येथील 63 वर्षीय व्यक्ती, जवाहर चौकातील राजश्री अपार्टमेंट येथील 67 वर्षीय महिला, शिवाजी स्टेडियमजवळील कच्छी हॉल येथील 56 वर्षीय व्यक्ती, गोठण गल्ली येथील 50 वर्षीय व्यक्ती आणि कमानवेस येथील 70 वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.
बँक अधिकारी आणि ब्रदरही पॉझिटिव्ह
जिल्हय़ातील एका मोठय़ा सहकारी बँकेत वरिष्ठ पदावर असणारा बँक अधिकारी कोरोनाने पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तो राहण्यास समडोळी येथे आहे. तर तासगाव-तुरची येथील एक व्यक्ती मिरजेतील मोठय़ा हॉस्पिटल मध्ये ब्रदर म्हणून काम करत आहे. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हय़ातील चौघांचा मृत्यू
कोरोनाचे उपचार सुरू असताना मंगळवारी चौघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये मिरज शहरातील अष्टविनायक चौकातील 70 वर्षीय महिलेचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील विजयनगर येथील 45 वर्षीय व्यक्तीचा रात्री कोरोनाने बळी गेला आहे. तर आंबेडकर नगर येथील 77 वर्षीय व्यक्तीचा पहाटे मृत्यू झाला. बुरूडगल्ली येथील 73 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या चौघांच्या बळीमुळे जिल्हय़ात कोरोनाने आतापर्यंत 41 जणांचे बळी गेले आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 1108
बरे झालेले 439
उपचारात 628
मयत 41