नवे 880 ः कोरोनामुक्त 1241 ः मृत्यू 23 ः मनपाक्षेत्रात 99 तर ग्रामीण भागात 781
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या आता चांगलीच उतरू लागली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट दोन महिन्यांच्या कालावधीनंतर दहा टक्क्यांजवळ आला आहे. हा जिल्ह्यासाठी फार मोठा दिलासा आहे. शुक्रवारी 880 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 1241 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूदर मात्र अद्यापही कमी झालेला नाही.शुक्रवारी 23 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 99 तर ग्रामीण भागात 781 रूग्ण वाढले आहेत. उपचारात 10 हजार 545 रूग्ण आहेत
23 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 23 जणांचे मृत्यू झाले आहेत. महापालिका क्षेत्रात सांगलीतील एकाचा मृत्यू झाला आहे. कडेगाव, कवठेमहांकाळ 1, खानापूर, वाळवा 4, पलूस, जत, शिराळा 2, तासगाव, मिरज 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
1241 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे एक हजार 241 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एक लाख 22 हजार 162 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील एक लाख आठ हजार 87 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रूग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
नवे रूग्ण 880
उपचारात 10545
बरे झालेले 108087
एकूण 122162
मृत्यू 3530
शुक्रवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 34
कडेगाव 54
खानापूर 60
पलूस 50
तासगाव 67
जत 85
कवठेमहांकाळ 70
मिरज 102
शिराळा 107
वाळवा 152
सांगली शहर 79
मिरज शहर 20
एकूण 880
आजचे लसीकरण 10269
एकूण लसीकरण 716434
कोरोना चाचणी – 8159