वाळवा, शिराळा, मिरज तालुक्यात अतिवृष्टी
प्रतिनिधी/सांगली
वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यात अतिवृष्टी झाली. तर पाणलोट क्षेत्रातही धुवाँधार सुरूच असल्याने वारणा धरणातील पाणी पातळी एका रात्रीत दीड टीएमसीने वाढली. सांगलीत बंधारा पाण्याखाली गेला. तर नागठाणे, बहे, बोरगाव पाण्याखाली गेल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
गेल्या चोवीस तासात सुरू असलेल्या दमदार पावसाने सांगली शहरात सर्वत्र दैना उडाली आहे. गुंठेवारी भागात शेकडो घरात पाणी घुसल्याने नागरिकांचा आताच थरकाप उडाला आहे. जिल्हÎात सर्वत्र सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. तथापि संभाव्य महापुराच्या भितीने नदीकाठ धास्तावला आहे. दुष्काळी भागातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. तर उभी पिके पाण्यात गेली आहेत. महाबळेश्वर, नवजा, वारणा परिसरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. शिराळा पश्चिम भागाला अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात 185 मिमी पावसाची नोंद झाल्याने धरणातील पाणीसाठÎा रात्रीत दीड टीमएसीने वाढला. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरू केला आहे. पण, विसर्गाचे पाणी आणि मुसळधार पाऊस यामुळे वाळवा शिराळा तालुक्यातील काही गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
वाळवा-इस्लामपूर परिसरात 97.1 आणि मिरज तालुक्यात 64.1 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्हÎात गेल्या 24 तासात सरासरी 45.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 64.1 (161.3), जत 3.2 (110.3), खानापूर-विटा 26.3 (60.4), वाळवा-इस्लामपूर 97.1 (155.0), तासगाव 30.3 (115.0), शिराळा 4.5 (162.9), आटपाडी 7.2 (64.2), कवठेमहांकाळ 16.5 (96.7), पलूस 67.3 (163.7), कडेगाव 22.3 (88.1)
वारणा धरणात 15.12 टीएमसी पाणी
वारणा धरणात गुरूवारी सकाळी 15.12 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 31.67 (105.25), धोम 4.99 (13.50), कन्हेर 2.30 (10.10), दूधगंगा 8.21 (25.40), राधानगरी 2.32 (8.36), तुळशी 1.72 (3.47), कासारी 0.91 (2.77), पाटगांव 1.67 (3.72), धोम बलकवडी 0.74 (4.08), उरमोडी 5.89 (9.97), तारळी 2.97 (5.85), अलमट्टी 25.07 (123).
वारणा, अलमट्टीसह धरणातून विसर्ग सुरू
मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वारणा, अलमट्टीसह अनेक धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 24, वारणा 1523, दुधगंगा 700, राधानगरी 841, तुळशी 500, कासारी 250, पाटगाव 225, उरमोडी 450 व अलमट्टी धरणातून 451 क्यूसेस विसर्ग सुरू आहे.