सांगली / प्रतिनिधी
पेट्रोल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मदन भाऊ युवा मंचच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी भाववाढीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारने भाव वाढ करून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. निवडणुकीपूर्वी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले. एक कोटी रोजगाराचे आश्वासन दिले. पंधरा लाखाचे गाजर दाखवले.
आता हे सर्व कोठे गेले अशी विचारणा करणाऱ्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर म्हणून सोडला. युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वातावरण सिकंदर जमादार, शितल लोंढे संतोष पाटील विशाल पडळकर यांच्यासह युवा म्हणजे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.