शिराळा / प्रतिनिधी
बत्तीस शिराळच्या कदमवाडी पूर्व येथील निळकंठेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्री दिवशीच नाग राजाचे दर्शन झाले. मंदिराच्या पायरीवर दुपारी अचानकपणे नाग आल्याने, भक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला. त्या नागाला धरून त्याचे पूजन केले आणि त्याला त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आले.
बत्तीस शिराळा आणि नाग या समीकरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. इथं नाग हा नुसता प्राणी नसून दैवतच आहे. आज महाशिवरात्री असल्याने कदमवाडी पूर्व येथील शिवमंदिरात दर्शनासाठी भाविक आले होते. यावेळी त्यांना मंदिराच्या पायरीवर नागराजाचे दर्शन झाले. मग त्या नागाला धरून आत मंदिरामध्ये नेण्यात आले. त्याची विधिवत पूजा करून त्याला त्याच्या मूळ अधिवासात सोडून देण्यात आले. यावेळी पृथ्वीराज कदम, संतोष कदम ,शहाजी पवार, राजेंद्र कदम ,सचिन कदम ,दिलीप कदम प्रणव यादव ,संदीप कदम यांनी नागराजाचे दर्शन घेतले.