प्रतिनिधी / शिराळा
शिराळा नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी प्रतिभा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीदरम्यान पिठासीन अधिकारी म्हणून तहसिलदार गणेश शिंदे यांनी काम पाहिले.
शिक्षण नियोजन व बांधकाम समिती सभापती पदाकरिता एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने प्रतिभा बजरंग पवार ह्या निवडून आल्याचे मुख्याधिकारी योगेश पाटील घोषित केले.
शिराळा येथील जेष्ठ छायाचित्रकार बजरंग उर्फ लालासाहेब पवार यांच्या त्या पत्नी आहेत. पवार यांची बहीण सुनिता सपकाळ यांची नुकतीच इस्लामपूर नगरपालिकेच्या बांधकाम सभापती निवडी झाली आहे. एकाच वेळी काही दिवसांच्या अंतराने बायको आणि बहीणीला बांधकाम सभापतीपद मिळाल्याने, पवार कुंटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अ.भा.मराठा समन्वय समिती शिराळा तालुका अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या प्रतिभा पवार या मातोश्री आहेत.